Gondia Adivasi Protest : धनगर आणि बंजारा समजाला आदिवासी आरक्षणात घेऊ नका, आदिवासी समाजाचा मोर्चा
Continues below advertisement
एसटी प्रवर्गात कोणत्याही जातीचा समावेश करू नये यासाठी मूळ आदिवासी समाजाकडून नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी, "आमचं ताट सुरक्षित आहे, पण कोणी घुसू नये म्हणून आदिवासी समाजाचा मोर्चा काढतोय," अशी प्रतिक्रिया देण्यात आली. आरक्षण नाकारल्यानंतरही पुन्हा आरक्षणाची मागणी करणे हे मूळ आदिवासी समाजावर अन्याय असल्याचेही नमूद करण्यात आले. धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणामध्ये हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. मात्र, धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाने विरोध दर्शवला आहे. या मागणीसाठी गोंदियामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाने मोर्चापूर्वी तयारी केली असून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले. तसेच, गोंदिया शहरातील सर्व देशी-विदेशी मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले. महायुती सरकारने आदिवासींच्या जमिनी भागीदारत्वावर देण्याबाबत काढलेल्या जीआरचाही या मोर्चात निषेध नोंदवण्यात आला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement