Chiplun : नऊ लाखांची रोकड घेऊन एसटीच्या टपावर काढले 9 तास, रोकड वाचवण्यासाठी व्यवस्थापकांची धडपड

Continues below advertisement

चिपळूण : गेल्या 36 तासांत अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. चिपळूणच्या कळंबस्ते भागात एका घराच्या छतावर अडकलेल्या 15 जणांची गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप सुटका केली आहे. 

कळंबस्ते भागशाळेजवळ जिथे वाशिष्ठीचा प्रवाह भयंकर आहे तिथे परवा रात्रीपासून माणसे घराच्या छतावर अडकली होती. नदीचा प्रवाह जवळच असल्यानं नदी आणि घर एक आहे अशी स्थिती झाली होती. परिसरातील घरं पूर्ण पाण्यात होती. काल पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत लोकं अडकली होती. यात वृद्धांसह लहान मुलं देखील होती. आता पूर ओसरला असून लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचण्याची प्रतीक्षा आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram