ST Mahamandal: एसटी महामंडळ राबवणार मद्यपान चाचणी मोहीम,तारखा जाहीर केल्याने उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह

Continues below advertisement

आता राज्यातील एसटी आगारातील एसटी चालकांची मद्यपानचाचणी करण्यात येणार आहे. मद्यपानाच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी एसटी महामंडळातील वाहतूक खातं, सुरक्षा आणि दक्षता खातं संयुक्तपणे दोन दिवस मद्यपान तपासणी मोहीम राबवणार आहे. मात्र अनेकांनी या मोहिमेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याचं कारण म्हणजे कुठल्या दोन दिवसांत ही मोहीम राबवणार हे चक्क जाहीर करण्यात आलंय. अशा चाचण्या कधी करणार हे सर्वसाधारणपणे सांगितलं जात नाही. कारण आधीच जाहीर केलं तर कर्मचारी सावध होतात, आणि पकडले जाऊ नये याची खबरदारी घेतात. त्यामुळे एसटीची ही मोहीम पारदर्शकपणे कशी राबवली जाणार असा प्रश्न उपस्थित होतोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram