ST Strike : ST कर्मचा-यांच्या विरोधात महामंडळ अवमान याचिका दाखल करणार, उच्च न्यायालयाची परवानगी
Continues below advertisement
Anil Parab on ST workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे. सरकारने हायकोर्टाच्या निर्देशानंतर समिती स्थापन करण्याबाबत काल जीआर काढला आहे. आता हायकोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे परब यांनी काल सांगितले होत. आज पुन्हा पत्रकारांशी बोलताना अनिल परब कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले असून ST कर्मचारी संघटनांविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. यावर आता उच्च न्यायालयानं ही परवानगी दिली आहे. तांत्रिक कारणांमुळे आज कागदोपत्री प्रक्रीया पूर्ण होऊ न शकल्यानं उद्या सकाळी एसटी महामंडळ ही याचिका दाखल करणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Maharashtra Government Msrtc St Anil Parab ST Workers MSRTC Strike ST Workers Strike Anil Parab On ST Protest Anil Parab On ST Workers