राज्य सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठीच्या घोषणेवर आम्ही समाधानी नाही, ST कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

गेल्या आठवड्यात धुळे जिल्ह्यातील साक्री डेपोमधील एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केलीय. कमलेश बेडसे असं या एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून साक्री डेपोत एसटी चालक म्हणून काम करत होता. आत्महत्येला एसटी महामंडळ जबाबदार असल्याचा उल्लेख कमलेशच्या सुसाईड नोटमध्ये आहे. एसटी महामंडळातील कमी पगार आणि अनियमित वेतनामुळे जीवन संपवत असल्याचं कमलेशनं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. कमलेशच्या आत्महत्येनंतर एसटी महामंडळातील विविध संघटना आक्रमक झाल्यात. या घटनेनंतर आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत ST कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 500 कोटींचा निधी घोषीत केला असुन एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भुमिका घेऊ नये अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर ताबडतोब ST कर्मचाऱ्यांचा थकीत पगाराबाबतील   Anil Parab यांनी घोषणा केली. पण राज्य सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठीच्या घोषणेवर आम्ही समाधानी नाही अशी ST कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram