ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून पुन्हा आश्वासन , 7 तारखेलाच पगार जमा होणार
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याच्या पाच तारखेआधी ३२० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून परिवहन मंडळाला देण्यात येईल. या निधीमधूनच एसटी कर्मचाऱ्यांचं प्रत्येक महिन्याचं वेतन त्या महिन्याच्या सात तारखेला करता येईल. शिस्त आवेदन पद्धतीत बदल करून, २०१७ सालाआधीच्या पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. त्यामुळं वाहकांसह इतर कर्मचाऱ्यांना अधिक पटीनं होणारा दंड टळणार आहे. वाहकांसाठी नव्यानं ३८ हजार एटीएम तिकीट मशीन आणण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठीचं कापड येत्या एका महिन्यात देण्यात येणार आहे.
Continues below advertisement