SSC Results 2023 : दहावी बोर्डाचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल, पुन्हा मुलींची बाजी
SSC Results 2023 : दहावी बोर्डाचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल, पुन्हा मुलींची बाजी
Maharashtra SSC Result 2023 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.
कोकण विभाग अव्वल तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल
दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर त्याखालोखाल कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती, लातूर, नाशिक आणि नागपूर विभागाने कामगिरी केली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी 92.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.