SSC Board Result 2024 : दहावीच्या निकालात मुलींचाच डंका, बोर्डाची संपूर्ण पत्रकार परिषद | Pune

SSC Board Result 2024 : दहावीच्या निकालात मुलींचाच डंका, बोर्डाची संपूर्ण पत्रकार परिषद | Pune

SSC 10th Result 2024 : पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board SSC Result LIVE) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. 

यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र तळाशी आहे. नागपूर विभाग 94.73 टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे. तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच विभागांमध्ये  मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 72 विषयांपैकी 18 विषयांचा 100 टक्के लागला आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 94.86 टक्के इतकी आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola