SSC HSC Board Exam Dates Out : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच

पुणे : दहावी (SSC Board) आणि बारावीच्या (HSC Board) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार यावर संभ्रम कायम होता. मात्र, आता हा संभ्रम दूर झाला असून परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली आहे. दरम्यान, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे लसीकरण अनिवार्य नसेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola