Sperm Doner : स्पर्म, एग डोनरला पालकत्त्वाचा कायदेशीर अधिकार नाही

Continues below advertisement

Sperm Doner :  स्पर्म . एग डोनरला पालकत्त्वाचा कायदेशीर अधिकार नाही  गर्भधारणेसाठी अंडकोष देणारी महिला बाळाची आई असल्याचा दावा करु शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. स्पर्म, एग डोनरला पालकत्त्वाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. गर्भधारणा होत नसलेल्या बहिणीला दुसऱ्या बहिणीने अंडकोष दिले. आयव्हीएफद्वारे गर्भधारणा झाली. जुळ्या मुलींचा जन्म झाला. या मुलींची खरी आई मीच आहे, असा दावा अंडकोष देणाऱ्या बहिणीने केला. नऊ महिने गर्भ सांभाळाऱ्या बहिणाला मुलींना भेटू दिले जात नव्हते. स्थानिक न्यायालयाने तसे आदेश दिले होते. त्याविरोधात तिने याचिका केली होती. ही याचिका मंजूर करत न्या. मिलिंद जाधव यांच्या एकल पीठाने स्थानिक न्यायालयाचे आदेश रद्द केले. जुळ्या मुलींना भेटू देण्याची मुभाही न्यायालयाने याचिकाकर्ती बहिणीला दिली.

हेही वाचा : राज्यसभेच्या १२ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर होणार,९ राज्यांतील १२ रिक्त जागांसाठी ३ सप्टेंबरला होणार निवडणूक.  
अमरावतीमध्ये काँग्रेसची आज महत्वाची बैठक,अमरावती आणि यवतमाळच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन,नाना पटोले,विजय वडेट्टीवारांसह इतर नेते राहणार उपस्थित.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू देशाला संबोधणार,स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने एक दिवस आधी होणारे कार्यक्रम.
विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता...ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार, सूत्रांची माहिती...
लोकसभेला चूक झाली, सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं...अजित पवारांची कबुली...
लोकसभेतल्या दुराव्यानंतर संघ आणि भाजपचं विधानसभेसाठी जुळलं...भाजपला फटका बसू नये म्हणून संघ मैदानात...सह-सरकार्यवाह अतुल लिमयेंकडे समन्वयाची जबाबदारी...
लाडक्या बहिणीवरून सुप्रीम कोर्टाचे सरकारला पुन्हा ताशेरे...पुण्यातल्या भूसंपादन प्रकरणी योग्य मोबदला द्या नाही तर लाडकी बहीण योजना थांबवू, कोर्टाची तंबी...
इस्रायलवर इराण हल्ला करण्याच्या तयारीत असताना अमेरिकेचं मोठं पाऊल, आण्विक पाणबुडीसह अनेक विनाशिका भूमध्य समुद्रात तैनात... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram