ABP Majha Impact| महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकं, आरोग्यमंत्र्यांचे आदेश
राज्यभरात रुग्णालयांच्या पाहणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत अनेक रुग्णांची रुग्णालयांकडून लुबाडणूक होत असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. त्यामुळं ही लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारनं एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये योजनेचा पूर्ण अभ्यास करून रुग्णालयांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करावी असा आदेश राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.