Special Report What is Generation Beta : GI TO AI तुमची ओळख काय? तुमची जनरेशन काय?

Continues below advertisement

Special Report What is Generation Beta : GI TO AI तुमची ओळख काय? तुमची जनरेशन काय?


२०२५ हे वर्ष सुरु झाले आहे १ जानेवारी पासून जन्मलेल्या मुलांना बीटा पिढी म्हणून ओळखले जाणार. कोणत्याही पिढीचे नाव त्या काळातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांच्या आधारे ठरवले जाते. एखाद्या पिढीची सुरुवात आणि शेवट त्या काळातील काही महत्त्वाच्या घटनेच्या आधारे ठरवला जातो. या पिढ्या सहसा १५-२० वर्षांच्या कालावधीसाठी टिकतात.लोकसंख्याशास्त्रज्ञ आणि भविष्यवादी मार्क मॅकक्रिंडल यांच्या लेखानुसार २०३५ पर्यंत जगात जेन बीटाची १६ टक्के लोकसंख्या असेल. तसंच जेन मिलिनिअल्स आणि जेन झेडची ही मुलं असतील. तसंच,ही पिढी २२ वं शतक पाहू शकणार आहे.जनरेशन बीटा हे जनरेशन अल्फाला फॉलो करणार आहे. त्यामुळे पहिल्या पिढीला सुचित करण्यासाठी नव्या पिढीला जेन बीटा नाव देण्यात आलंय. ही पिढी पूर्णपणे भिन्न जगाने आकार घेईल. जनरेशन बीटा हा आपल्या विकसित होत असलेल्या जगाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे.सायबर एक्सपर्ट अनय जोगळेकर म्हणतात या पिढीच्या हातात विश्व असेल एका क्लिक वर माहिती उलब्ध होईल AI तंत्रद्यान या पिढी सोबत असेल याचे अनेक चांगल्या गोष्टी घडतील… पण तश्याच यावर नियंत्रण असणेही म्हट्वच असणार आहे नाही तर याचा तोटा ही होऊ शकतो…द ग्रेटेस्ट जनरेशन (GI जनरेशन): १९०१-१९२७ या पिढीतील बहुतेक लोकांना महामंदीचा सामना करावा लागला होता.  द सायलेंट जनरेशन: १९२८-१९४५ महामंदी आणि दुसरे महायुद्ध यांच्या परिणामांमुळे ही पिढी द सायलेंट जनरेशन म्हणून ओळखली जाते.

बेबी बूमर पिढी: १९४६-१९६४
या काळात लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे या पिढीला बेबी बूमर्स असे नाव देण्यात आले.

जनरेशन X: १९६५-१९८०
नवीन तंत्रज्ञान, इंटरनेट आणि व्हिडीओ गेम्सची सुरुवात या काळात झाली

मिलेनियल्स किंवा जनरेशन Y: १९८१–१९९६
सर्वाधिक बदल या पिढीने पहिले, आणि तंत्रज्ञानाने स्वतः ला प्रगल्ब केले

जनरेशन Z: १९९७-२००९
इंटरनेट जगात या पिढीचा जन्म झाला असल्याने, ही पिढी इंटरनेट आणि गॅजेट वर अवलंबून आहे

जनरेशन अल्फा: २०१०-२०२४
सोशल मीडिया आणि स्मार्टफ़ोन चा भडिमार या काळात झाला आणि त्यात या पिढीचे आणि त्यांच्या पालकांचे आकर्षण वाढले

जनरेशन बीटा: २०२५-२०३९
जनरेशन बीटाच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा अधिक प्रभाव पडेल, १ जानेवारीपासून ही मुले अशा जगात वाढतील जिथे तंत्रज्ञान जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असेल…

सामाजिक संशोधक मार्क मॅकक्रिंडल यांच्या मते, नव्या पिढीचे हे नामकरण एका नव्या अध्यायाच्या सुरुवातीचे संकेत देते. जनरल बीटा ही तंत्रज्ञानाच्या युगात जन्मलेली पिढी आहे. या मुलांना स्मार्टफोन, रोबोट आणि एआयने वेढले जाईल. हा असा काळ आहे जेव्हा जग झपाट्याने बदलत आहे आणि ही मुले या बदलाची साक्षीदार आणि सहभागी असतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram