Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. यंदा मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि काँग्रेसची (Congress) युती झाली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी काहीसे नमते घेत वंचितला 62 जागा देऊ केल्या होत्या. तर काँग्रेस पक्ष 150 जागांवर लढणार होता. मात्र, आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपून गेल्यानंतर वंचितने त्यांच्या वाट्याला आलेल्या 62 पैकी फक्त 46 जागांवरच उमेदवारी अर्ज भरल्याचे समोर आले आहे. 16 जागांवर वंचितने उमेदवार न मिळाल्यामुळे अर्ज भरले नाहीत. त्यामुळे आता काँग्रेसला डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे. (BMC Election 2026)
काँग्रेस पक्षाने मोठ्या विश्वासाने वंचित बहुनज आघाडीला 62 जागा देऊ केल्या होत्या. मात्र, मुंबईत वंचित बहुजन आघाडीची फारशी ताकद नसल्याने 16 जागांवर पक्षाला उमेदवारच मिळाले नाहीत. ही गोष्ट समजल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला याबाबत कळवले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर वंचितकडून याबाबत काँग्रेसला कल्पना देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसलाही या 16 जागांवर आपल्या इच्छूक उमेदवारांना एबी फॉर्म देऊन रिंगणात उतरवता आले नाही. विशेष म्हणजे या 16 जागांपैकी काही ठिकाणी काँग्रेसची चांगली ताकद आहे. तरीही युतीत मिठाचा खडा पडू नये म्हणून काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी या जागा मोठ्या मनाने वंचितला देऊ केल्या होत्या. परंतु, वंचितने याठिकाणहून उमेदवारी अर्जच भरलेला नाही. परिणामी आता काँग्रेसला या 16 जागांवर बंडखोरी करुन अपक्ष उभ्या राहिलेल्या आपल्याच उमेदवारांना पाठिंबा देण्याची नामुष्की सहन करावी लागणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसला या 16 जागांवर अधिकृतपणे उमेदवार उभे करता येणार नसले तरी शक्य तिथे बंडखोर उमेदवारांशी चर्चा करुन काय मार्ग काढता येईल, असा प्रयत्न पक्षाकडून केला जाईल. दरम्यान, 1999 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस राज्यातील महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा लढवत आहे.