Special Report Tanaji mutkule vs Santosh Bangar:स्टिंग ऑपरेशनचं टशन,2 डिसेंबरनंतर युतीचं काय होणार?

Continues below advertisement

Special Report Tanaji mutkule vs Santosh Bangar:स्टिंग ऑपरेशनचं टशन,2 डिसेंबरनंतर युतीचं काय होणार?

उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंनी भाजपशी संधान बांधल्यानंतर ५० खोके एकदम ओके या विरोधकांच्या बोचऱ्या आरोपांनी शिंदेसेनाला अक्षरश घायाळ केलं होतं...विरोधकांच्या याच आरोपांना आता थेट भाजप आमदार तानाजी मुटकुळेंनीच बळ दिलंय...सत्तांतरासाठी कमळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी ५० कोटी घेतल्याचा खळबळजनक आरोप मुटकुळेंनी केलाय...यामुळे हिंगोलीतल्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीत वादाची नवी ठिणगी पडलीय...या निवडणुकीत शिंदेंचे आमदार संतोष बांगर आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय...कधीकाळी चल मेरे साथी म्हणणाऱ्या या दोन्ही नेत्यांना आता एकमेकांचे काळे धंदे दिसायला लागलेत...बांगरांनी रेती आणि जुगाराचे अड्डे सुुरु केल्याचा आरोप मुटकुळेंनी केलाय...त्यामुळे केवळ निवडणुकीपुरतं उणीदुणी काढणाऱ्या विरोधकांनी जनतेच्या हितासाठी नेहमीच आवाज उठवला तर खरंच जनतेचं कल्याण होईल यात मात्र तिळमात्र शंका नाही...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola