Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Sharad Pawar on Varkari community: वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त (Sahitya Sammelan) प्रकाशित स्मरणिकेत शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून याबाबत भाष्य करण्यात आले आहे. वारकरी (Varkari) संप्रदायात 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना (Religious forces) बळ देणारी असल्याचे मत शरद पवारांनी मांडले. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला नाहीत, असल्याची खंतही शरद पवार यांनी व्यक्त केली. (Maharashtra Politics news)
महिला अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन शनिवारी दिल्लीत (Delhi news) पार पडत आहे. थोड्याच वेळात ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे. आज संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत केंद्रीय मंत्री असताना महिलांसाठी वेगळे धोरण (Women policies) आखण्याची गरज तुम्हाला का भासली, यावरही शरद पवार यांनी भाष्य केले आहे. माझ्यावर काही व्यक्तींचा अत्यंत प्रभाव आहे. त्यातील एक म्हणजे माझी आई. त्याकाळी जिल्हा लोक बोर्डात महिला प्रतिनिधीसाठी एक जागा असायची. त्या जागेवरुन संपूर्ण जिल्ह्यातून माझी आई निवडून आली होती. तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती एकही बैठक चुकवायची नाही. अभ्यास करुन जायची. त्याकाळी प्रवासाची साधने नसायची. खासगी मोटर सर्व्हिस होती, एसटी नसायची, असे शरद पवार यांनी म्हटले.