Special Report : Shahajibapu Patil : गुवाहाटीत नव्हे, आता सांगोल्यातही काय झाडी, काय डोंगार!

Continues below advertisement

Special Report : Shahajibapu Patil : गुवाहाटीत नव्हे, आता सांगोल्यातही काय झाडी, काय डोंगार!

ही बातमी पण वाचा

Shambhuraj Desai: एकनाथ शिंदेंचा प्रदिर्घ अनुभव; त्यांचा सहभाग शासनात हवा, शिवसेनेते काय सुरुय?, शंभूराज देसाईंनी सांगितलं!

 

Shambhuraj Desai: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची सकारात्मक चर्चा झाली. तिन्ही पक्षांचा मान राखला जाईल. येत्या एक-दोन दिवसांत योग्य तो मार्ग निघेल, असं शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज पत्रकार परिषद घेत दिल्लीतील बैठकीबाबत माहिती दिली. 

एकनाथ शिंदेंचा प्रदिर्घ अनुभव आहे. त्यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय बघता एकनाथ शिंदेंचा शासनात सहभाग असला पाहिजे, असं शिवसेनेचं मत आहे. एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत जी भूमिका घेतली, तिच आमची पण भूमिका आहे, असंही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं. 

शंभूराज देसाई नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदेंचा प्रदीर्घ अनुभव, त्यांनी घेतलेले निर्णय पाहता त्यांचा शासनात सहभाग असला पाहिजे असं मत शंभूराज देसाईंनी व्यक्त केलं. तसेच मागणी करणं आणि चर्चा करणं यात गैर नाही. मात्र आम्ही आमचे सर्व अधिकाराचे अधिकार एकनाथ शिंदेंकडे दिलेत. ते घेतील तो निर्णय मान्य असेल. एकनाथ शिंदेंच्या अनुभवाचा फायदा या महायुतीला मिळायला हवा, त्या अनुशंगाने आम्ही आग्रही आहोत ते शासनात असायला हवेत. तसेच मंत्रिमंडळात कोणाचं स्थान असणार हे मुख्यनेते ठरवतील, असंही शंभूराज देसाई यांनी सांगितले. दरम्यान, एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. 

उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित-

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार की नाही, यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद, तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर एकनाथ शिंदे यांनी देखील स्वत: उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं, असं अमित शाह यांनी सांगितले. मात्र एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय कळवला नाही, अशी सूत्रांच्या माहितीनूसार समोर येत आहे. आज मुंबईत पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram