Special Report One Nation One Election : एक देश एक निवडणूक! नव्या तरतुदी काय असतील?
संविधानाला धोका देण्याचे काम कॉंग्रेसने केले, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. मोदी यांच्या टिकेनंतर विरोधकांकडून जोरदार हंगामा करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत बोलत होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कॉंग्रेसच्या मनात कटुता होती. कॉंग्रेसने कधीही संविधानाला मानले नाही. कॉंग्रेसने देशाच्या संसदेला अंधारात ठेवले. आणीबाणीच्या काळात निर्दोष लोकांना तुरूंगात ठेवले. इंदिरा गांधी यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
कॉंग्रेसच्या पंतप्रधानांनी आरक्षणाच्या विरोधात काम केले. कॉंग्रेसने सत्तेसाठी धर्माच्या आधारावर खेळ खेळला. 55 वर्ष देशावर एकाच परिवाराने राज्य केले. नेहरूंची परंपरा इंदिरा गांधी यांनी पुढे सुरू ठेवल्याचाही आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. संविधानाला धोका देण्याचे काम कॉंग्रेसच्या काळात झाले. कॉंग्रेसची सत्ता गेल्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळाले. अहंकारात कॅबिनेटचा निर्णय फाडला. सत्तेसाठी धार्मिक आरक्षणाचा खेळ, असेही मोदींनी म्हटले.