Special Report | पांढरं सोनं शेतकऱ्यांच्या चिंता वाढवणार? नवा हंगाम 15 दिवसांवर, मात्र जुना कापूस अजूनही घरात!

Continues below advertisement
 यवतमाळ  जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांचं पांढरं सोनं विक्री अभावी घरात साठवून आहे. पणन महासंघाची खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. अशावेळी खरीप हंगाम अगदी 14 दिवस समोर असताना नियोजन कसे करायचे असा प्रश्न हजारो कष्टकरी शेतकऱ्यांना पडलाय. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस घरात आहे. नोंदणी न  केलेल्याही शेतकऱ्यांचाही कापूस विक्री अभावी घरात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कापसाची प्रातिनिधिक स्वरूपात होळी करून आंदोलन केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram