Special Report | डुगवे गावचा अनोखा शिमगोत्सव, दुर्मीळ जीवाच्या रक्षणासाठीचा आगळावेगळा सोहळा | ABP Majha
Continues below advertisement
अवैध तस्करीमुळे सध्या नामशेष होत असलेल्या प्रजातींमधला एक दुर्मीळ जीव म्हणजे खवले मांजर. कोकणातल्या अनेक भागात खवलेमांजराचा अधिवास आहे. चिपळुणातल्या डुगवे गावच्या जंगलातही या दुर्मीळ जीवाचं अस्तित्व इथल्या गावकऱ्यांना आढळून आलं. आणि या गावकऱ्यांनी सह्याद्री निसर्ग मित्र ग्रुपच्या साहाय्यानं या जीवाच्या रक्षणाचा विडा उचलला. त्यासाठी गावकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून शिमगोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पाहूयात डुगवे ग्रामस्थांचा हा खवले मांजरासाठीचा अनोखा शिमगोत्सव....
Continues below advertisement