Special Report | रामभाऊ लाड यांचा शंभरीत प्रवेश, सांगलीच्या कुंडलमधला 'अनसंग वॉरियर'
रामचंद्र श्रीपती लाड...स्वातंत्र्य संग्रामातील धगधगता निखारा...क्रांतीवीर कॅप्टन आज शंभरीत प्रवेश करतायत... स्वातंत्र्यलढ्यात सांगली जिल्ह्यातील कुंडल गावची कामगिरी मोलाची आहे...क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारची राजधानी म्हणून कुंडलची ओळख आहे...पत्री सरकारचं शक्तीस्थळ म्हणजे तुफान सेना... आणि या सेनेचे कॅप्टन होते रामभाऊ लाड...ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या या तुफान सेनेचा शेवटचा धागा म्हणजे कॅप्टन रामभाऊ आज शंभरीत प्रवेश करत आहेत...वयाच्या मनाने सध्या काही आठवत नसलं तरी आज देखील आवाजात धमक आहे.