Special Report Manoj Jarange : जरांगे पाटलांकडून जुन्या कुणबी नोंदींची पाहणी, सरकार ग्राह्य धरणार?
मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्या अशी मागणी करत महाराष्ट्राचा दौरा करणारे मनोज जरांगे पाटील आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदीरात पोहोचले.. आणि मंदिराच्या पुरोहितांनी एक खजिनाच जरांगेच्या हाती सोपवला.. हा खजिना पाहून जरांगेही खुष झाले.. आणि त्र्यंबकेश्वाराने मोठा आशीर्वाद दिला अशी प्रतिक्रियाही दिली.. काय आहे जरांगेंना मिळालेला हा खजिना पाहूयात..