Special Report | राष्ट्रीय प्रश्न मिटला, मटण दराचा तिढा सुटला ! | ABP Majha

 गेल्या महिन्यापासून गाजत असलेल्या मटण दराच्या वादावर आज तोडगा निघाला.. आज झालेल्या बैठकीत मटणाला 480 रूपये किलो एवढा दर खाटीक समाजाने मान्य केलाय.. या निर्णयामुळे कोल्हापूरकरानी आनंदोत्सव साजरा केला.. शिवाजी पेठेत खाटीक समाज आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आज बैठक झाली.. गेल्या एक महिन्यांपासून कोल्हापूरकरांच्या आवडीचं मटण 580 रूपये प्रति किलो पेक्षा महाग झाल्यामुळे कोल्हापूरकर अवस्थ होते.. मटणाचे दर कमी करावेत यासाठी कोल्हापूरकरांनी वेगवेगळ्या प्रकारे निदर्शनं केली होती.. अखेर आजच्या निर्णयानंतर कोल्हापूरकरांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola