Aurangabad : Special Report : औरंगाबादेत 1 मे रोजी होणाऱ्या सभेवरुन राजकीय वातावरण तापायला सुरुवात

औरंगाबादेत एक मे रोजी होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेवरुन राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. कारण या सभेला राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलसह अर्धा डझन संघटनांनी विरोध केलाय. पण कोणत्याही परिस्थिती सभा घ्यायचीच... असे आदेश एकप्रकारे राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. त्यामुळं कितीही विरोध झाला तरी औरंगाबादेत सभा घेण्यावर मनसे ठाम आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सभेच्या नियोजनाबाबत आढावा घेत सभा स्थळाची पाहणी केली.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola