Special Report | गृहखातं राष्ट्रवादीच्या नेत्यांवर मेहरबान आहे का?
नाना पटोले, प्रणिती शिंदे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांवर राजभरात मागील काही दिवसात गुन्हा दाखल झालेत. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कोणताही गुन्हा का दाखल होत नाही असा सवाल अनेक घटनांमुळे सध्या उपस्थित होतोय. सोलापुरात मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. मात्र या प्रकरणात केवळ आयोजकांवरतीच पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत आणि मंत्र्यांना मात्र सोडून दिलय