Special Report Nilesh Rane Raid : बातमी कॅशची, रिपोर्ट राणेंचा, निलेश राणेंवरुन महायुतीत तेढ

Continues below advertisement

Special Report Nilesh Rane Raid : बातमी कॅशची, रिपोर्ट राणेंचा, निलेश राणेंवरुन महायुतीत तेढ

महायुतीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू असतानाच आता २ डिसेंबरनंतर मोठा राजकीय भूकंप होणार का असा सवाल उपस्थित होतोय...याला कारण ठरतंय भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांचं...२ डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची असल्याचं वक्तव्य रविंद्र चव्हाणांनी केल्यानं एकच खळबळ उडालीय...कोकणात निलेश राणेंनी केलेल्या आरोपांनतर चव्हाणांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलंय...त्यामुळे २ डिसेंबरनंतर शिवसेनेच्या सर्व आरोपांना भाजप चोख उत्तर देणार का? हा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय...कल्याण-डोंबिवलीसोबतच सिंधुदुर्गामध्येही रविंद्र चव्हाण शिवसेना नेत्यांच्या टार्गेटवर आहेत...कल्याण-डोंबिवलीतल्या फोडाफोडीनंतर दुखावलेल्या शिंदेंनाी थेट अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीही गाठली होती...मात्र आता चव्हाणांचं वक्तव्य महायुतीसाठी धोक्याची घंटा देणार आहे की केवळ पोकळ इशारा आहे हे पाहणं महत्वाचं ठरणआर आहे...दरम्यान श्रीकांत शिंदेंनी रविंद्र चव्हाणांना उत्तर दिलंय...त्यामुळे भाजप-शिवसेनेतला हा  संघर्ष कोणत्या टोकाला जातो हे पाहावं लागेल...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola