Special Report MVA VS Mahayuti Protest :जोडे मारे VS जबाव दो;मविआच्या आंदोलनाला भाजपकडून प्रत्युत्तर

Continues below advertisement

Special Report MVA VS Mahayuti Protest :जोडे मारे VS जबाव दो;मविआच्या आंदोलनाला भाजपकडून प्रत्युत्तर

ही बातमी पण वाचा

उद्धव ठाकरेंनी मविआला सोडून बॅक टु पॅव्हेलियन यावं, संजय राऊतांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करावं, मंत्री रामदास आठवलेंचे आवाहन

Ramdas Athawale Sindhudurg : पूर्वीचं राजकारण नीतिमत्तेवर आधारीत होतं,  परंतु आता जे मी पाहतोय आरोप प्रत्यारोप ते अती होतंय. पतंप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) काम पाहून विरोधकांचा जळफळाट होतोय. मोदींनी काहीं केलं तरी विरोधक जळफळाट करतात. आमच्या सरकारला बहुमत आहे,  त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालणार आहे. लोकसभेला जागा आमच्या कमी निवडून आल्या तरी विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील. असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी बोलताना व्यक्त केला आहे.   

विरोधकांना घेऊन पुतळा उभारण्यासंदर्भात एक समिती बनवावी. या संदर्भात मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलेन. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला सोडून बॅक टु पॅव्हेलियन यावं. त्यासाठी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना योग्य मार्गदर्शन करावं, असे आवाहनही मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. राज्यात सुरू असलेले जोडे मारो आंदोलन हा प्रसिद्धीचा स्टंट आहे. आम्ही ही कोणालापण जोडे मारू शकतो. अस आंदोलन करणे योग्य नाही, वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायला हरकत नव्हती. जोडे मारों आंदोलन त्यांनी मागे घ्यावे,  अशी माझी महाविकास आघाडीला विनंती असल्याचेही रामदास आठवले म्हणाले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram