Special Report Mumbai landslide :मायानगरी धोकादायक, डोंगराळ भागातील रहिवाशांना बीएमसीची नोटीस
मुंबई... स्वप्नांची मायानगरी. इथं अनेक जण अनेक स्वप्नं घेऊन येतात.पण ती स्वप्नं गाठताना मुंबईत लोक अत्यंत धोकादायक जागी राहत असतात..कुणी विचारही करु शकणार नाही अशा ठिकाणी त्यांची वर्षेच्या वर्षे जातात. चेंबूरच्या गौतमनगरमधल्या या डोंगराळ भागात अनेक लोक जीव मुठीत घेऊन जगतायत. मुंबई महापालिकेनं काही दरडग्रस्त भागात धोकादायक घरं आणि इमारतींना नोटिसा दिल्यात. पण या डोंगराळ भागात कोणताही इशारा दिला गेलेला नाही. धोकादायक इमारतींना/झोपड्यांना एस विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना/नोटिसा आधीच देण्यात आल्यात.त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित भागातील स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे.स्थलांतर न करता तिथंच राहणाऱ्या रहिवाश्यांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल.नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही.