Special Report Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचं धुमशान; शेतकऱ्यांना मोठा फटका

Continues below advertisement

Special Report Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचं धुमशान; शेतकऱ्यांना मोठा फटका

ही बातमी पण वाचा

Special Report Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचं धुमशान; शेतकऱ्यांना मोठा फटका

परभणी: मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आणि विदर्भात आज सकाळपासूनच पावसाने दाणादाण उडवून दिल्याचं पाहायला मिळालं. बुलडाणा, हिंगोली, परभणी आणि वाशिम जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून परभणीतही शेकडो हेक्टर शेती पाण्यासाठी गेल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. वाशिम शहरातील शेलूबाजार येथील कारंजा रोडवर असलेल्या सेंट्रल बँक, स्टेट बँक एटीएम सुविधांसह काही  ग्रामपंचायतच्या गाळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले. या कॉम्प्लेक्समधील खालच्या माळ्यात असलेल्या  हार्डवेअर, इलेक्ट्रिकल दुकानं आणि हॉटेल लाईनमध्येही पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान झाल्याने आता प्रशासनाने आमच्या शेती व दुकानांची पाहणी करुन पंचनामा करावा, अशी मागणी केली जात आहे. 

मराठवाड्यातील (Marathwada) तीन जिल्ह्यांना आज पावसाने चांगलंच झोडपलं असून मुसळधार पावसामुळे (Rain) परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली नदीला पूर (Flood) आला आहे. या पुरात जवळपास 100 हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या शेत पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिंतूर तालुक्यातील अकोली,भोसी,वरुड(नृ), बलसा, मालेगाव, पाचलेगाव, दगडचोप, चारठाणा,निरवाडी, अंबरवाडी,अंगलगाव, सोन्ना, आडगाव, बेलखेडा, पिंप्राळा या गावांमध्ये नदीपात्र फुटुन शेत पिकांचे‌ आतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन,कापूस, हळदीसह इतर खरीप पिकांचेदेखील मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

हिंगोलीत 5 जणांना केलं रेस्कू

हिंगोलीतही आज जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळालं. शेतातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती होती. हिंगोलीच्या सावरखेडा गावामध्येसुद्धा अनेक ठिकाणी पूर आला असून येथील एका शेतात पाच जण अडकले होते. त्या पाच जणांना प्रशासनाच्यामदतीने बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आले. त्यासाठी जिल्हा पोलीस दल आणि महसूल प्रशासनाच्यावतीने संयुक्तपणे या पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram