Special Report Mahim Constituency : माहीमची डील का झाली नाही? मनसे-शिवसेनेची इनसाईड स्टोरी

Continues below advertisement

Special Report Mahim Constituency : माहीमची डील का झाली नाही? मनसे-शिवसेनेची इनसाईड स्टोरी


माहिमच्या जागेवरून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सबंध ताणले गेलेत,
काल सदा सरवणकर हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार हे जवळपास निश्चित झाले असताना, आयत्या क्षणी त्यांनी तो मागे घेतला नाही, यामुळे आश्चर्य वाटले,
पण सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही? याची इन साईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.

सदा सरवणकर हे काल राज ठाकरे यांना भेटायला गेले मात्र त्यांना राज भेटलेच नाही, सर्व प्रसार माध्यमांसमोर सरवणकर हे माघारी फिरले, त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेता, संघर्षाची वाट निवडली, मात्र त्याआधी काही गोष्टी घडल्या

सरवणकर यांना माघार घ्यायला लावण्यास एकनाथ शिंदे यांना यश आले होते, अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर सरवणकर हे तयारही झाले होते, मात्र त्याबदल्यात शिवसेनेचा एक प्रस्ताव होता,
शिवसेना, महिमची जागा सोडेल मात्र मनसेने शिवसेनेच्या विरोधातील 10 जागांवर उभे केलेले उमेदवार घ्यावे असा हा प्रस्ताव होता,
या 10 जागा कोणत्या असतील हे देखील जवळपास निश्चित झाले होते,

हा निरोप शिवतीर्थावर पोचला, कोणत्या जागा असतील हे देखील सांगण्यात आले, त्यावर राज ठाकरे तयार देखील झाले होते, असे सूत्रांनी सांगितले,
दुपारपर्यंत या घडामोडी पडद्याच्या मागे घडत होत्या, मात्र त्यापुढे काहीच हालचाल झाली नाही,
वर्षावर मुख्यमंत्र्यांना भेटून राज ठाकरे यांना भेटायला सरवणकर आले, त्यांनी शिवतीर्थावर निरोप देखील पाठवला, मात्र सरवणकर यांना भेट नाकारण्यात आली, अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ निघून गेली आणि शिवसेना विरुद्ध मनसे हा संघर्ष निश्चित झाला,
त्याआधी जेव्हा एकमेकांच्या विरोधात उमेदवार द्यायचे की नाही हे, निश्चित होत होते, तेव्हा चर्चेत भांदुपची जागा शिवसेनेने सोडावी, अशी चर्चा सुरू होती, मात्र ऐनवेळी मनसेने माहिमच्या जागी अमित ठाकरे यांची घोषणा केली, त्यावेळी शिवसेनेला अंधारात ठेवले, असे शिवसेना सूत्रांनी सांगितले,
त्यानंतर एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमात राज ठाकरे पक्ष आणि चिन्हावरून जे बोलले ते देखील शिवसेनेच्या नेत्यांना रुचले नाही,
त्यामुळे सर्व ठरले असताना, सरवणकर यांनी माघार घेतली नाही,


अर्ज मागे घेण्याच्या आधी समोरासमोर बसून चर्चा व्हावी असे मत शिवसेना नेत्यांचे होते मात्र सरवणकर यांना भेट नाकारल्याने शिवसेनेने अमित ठाकरेंच्या विरोधात लढणार नसल्याचा जो निर्णय घेतला होता तो मागे घेतला,

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram