Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?

Continues below advertisement

Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांचे दौरे, प्रचार, सभा, रॅली मोठ्या प्रमाणावर काढल्या जात आहेत. अशातच विधानसभेच्या दौऱ्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची (सोमवारी) वणी येथे हेलीपॅडवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी केली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर काल (मंगळवारी)  पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. वणीनंतर औसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्यावरती भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे. 

काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते म्हणत भाजपचा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची देखील तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली असं म्हणत भाजप पक्षाकडून ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगचीही तपासणी झाल्याचा व्हिडिओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी करण्यात आली होती. भाजप पक्षाकडून याबाबची व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram