Special Report Fast track Court : Badlapur Crime News : फास्ट ट्रॅक कोर्टाचं स्लो वास्तव
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Fast track Court : Badlapur Crime News : फास्ट ट्रॅक कोर्टाचं स्लो वास्तव
ही बातमी पण वाचा
Special Report Fasttrack Court : Badlapur Crime News : फास्ट ट्रॅक कोर्टाचं स्लो वास्तव
पुणे: पुण्यातील मुळा-मुठा नदी पात्रात सापडलेल्या महिलेच्या खुनाचे रहस्य अखेर पुणे पोलिसांनी शोधून काढलं आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सकिना खान या महिलेची अतिशय निर्घृण हत्या (Pune Crime News) केली. विशेष म्हणजे यामागचा खरा सूत्रधार तिचा सख्खा भाऊ निघाला. सकिनाचा सख्खा भाऊ आणि वहिनीने सकीनाचा गळा दाबून जीव घेतला आणि त्यानंतर पुरावे नष्ट होतील या उद्देशाने तिचे तुकडे केले आणि नदीत फेकून दिले. सकीना ज्या भागात राहत होती तिच्या शेजाऱ्यांना ती कुठे गायब झाली आहे याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
नेमकं काय घडलं?
पुण्यात गेल्या काही दिवसांपुर्वी मुळा-मुठा नदी पात्रात सापडलेल्या मृतदेहाच आज अखेर उलगडा झाला आहे. 26 ऑगस्ट रोजी मुळा-मुठा नदी पात्रात सापडलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाचा तपास पुणे पोलिसांनी जवळपास पूर्ण केला आहे. हा मृतदेह कोणाचा आहे, हत्या का केली, हत्या करणारे कोण होते, आणि इतर गोष्टींचा छडा आज पुणे पोलिसांनी लावली आहे. सकीना खान नावाच्या महिलाचा हा मृतदेह (Pune Crime News) होता, तिची अशी निर्घृण हत्या तिच्या सख्ख्या भावाने आणि वहिनीने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.