Special Report Fadnavis inaugurates bridge : बांधून दाखवलाच, गडचिरोलीतल्या पुलाची कहाणी

Continues below advertisement
Special Report Fadnavis inaugurates bridge : बांधून दाखवलाच, गडचिरोलीतल्या पुलाची कहाणी


देशात दरवर्षी हजारो किलोमीटरचे रस्ते आणि शेकडो पूल बांधले जातात... मात्र गडचिरोली जिल्ह्यातील 32 किलोमीटरचा सडक मार्ग आणि त्यावरील जांबिया नदीवरील ताडगुडा पूल आणि इतर नाल्यांवरील छोटे पाच पूल बांधण्यासाठी शासन आणि प्रशासनाला जी मशक्कत करावी लागली आहे.. ती इतर कुठेच करावी लागली नसावी... गडचिरोलीतील एका पुलाची ही कहाणी...गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील हे ताडगुडा गावाजवळील पुल... अवघ्या 70 ते 80 मीटर लांबीचा हा पूल खूप मोठा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जगा वेगळा पुल नाही... मात्र, तरी हा पूल लक्षवेधी आहे, कारण हा पूल माओवाद्यांचा विरोध झुगारून, त्यांच्या बालेकिल्ल्यात, त्यांच्या नाकावर टिच्चून बांधण्यात आला आहे... एटापल्ली तालुक्यातील गट्टा, गर्देवाडा, वांगेतुरी, मेंढरी या संपूर्ण परिसरात माओवाद्यांची अनेक दशके दहशत होती... त्याच्या जोरावर अनेक वर्ष माओवाद्यांनी या भागातील विकास कामे रोखून धरली होती... अगदी छोटा माती व खळीचा रस्ता बांधायचा असेल, तरी माओवाद्यांचा जोरदार विरोध असायचा.. एखाद्या कंत्राटदा राने काम सुरू केलं, तर त्याच्या ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी अशा बांधकाम यंत्रांची जाळपोळ केली जायची.. मजुरांना धमकावले जायचे.. आणि प्रसंगी हत्याही केली जायची.. माओवाद्यांचा असाच विरोध तारगुडा पुलाला आणि गट्टा ते वांगेतुरी दरम्यानच्या रस्ते निर्मितीलाही होता... त्यामुळे जांबिया नदीच्या पलीकडे छत्तीसगडच्या सीमेपर्यंतच्या सुमारे वीस गावातील नागरिकांना पावसाळ्याच्या काळात वर्षाचे किमान पाच महिने उर्वरित महाराष्ट्रापासून संपर्क विहीन राहावे लागायचे... त्या काळात अत्यंत गरजेच्या कामासाठी या भागातील रहिवाशांना एक तर धोका पत्करून नदीतून प्रवास करावा लागत होता... किंवा छत्तीसगडमध्ये जाऊन अनेक किलोमीटर फिरून परत महाराष्ट्रात यावे लागायचे.. त्यामुळे अनेक वेळेला प्रशासनानं या ठिकाणी रस्ता निर्मिती आणि पूलांच्या निर्मितीचा काम हाती घेण्याचा प्रयत्न केला.. मात्र प्रत्येक वेळेला माओवाद्यांनी आडकाठी आणून काम सुरूच होऊ दिले नाही, किंवा सुरू झालेल्या कामात हिंसेच्या माध्यमातून अडथळे निर्माण केले...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram