Special Report : भोसरी एमआयडीसी भुखंड गैरव्यवहार प्रकरण, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना ईडीकडून समन्स

ईडीनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळं हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंना मोठा झटका दिला आहे. जावई गिरीश चौधरींच्या अटकेनंतर  एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे.  खडसे यांना उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. या अगोदर जानेवारी महिन्यात या प्रकरणात ईडीने खडसेंची चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे ईडीच्या तपासाचा ससेमिरा लागल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंकडे ईडीनं मोर्चा वळवला आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola