Special Report Devendra Fadnavis : देवाभाऊ अभिनंदन, ठाकरेंच्या शिवसेनेचा फडणवीस विरोध सॉफ्ट होतोय?

Continues below advertisement

Special Report Devendra Fadnavis : देवाभाऊ अभिनंदन, ठाकरेंच्या शिवसेनेचा फडणवीस विरोध सॉफ्ट होतोय?
फडणवीसांचं केलेलं कौतुक. एवढंच नाही तर या अग्रलेखात फडणवीसांचा उल्लेख अनेकदा देवाभाऊ असा करण्यात आला आहे. 

याआधीही अशा दोन घटना घडल्या आहेत. पहिली घटना म्हणजे, देवेंद्र फडणवीसांनी शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. एक जमाना होता उद्धव ठाकरे फडणवीसांचेही फोन घेत नव्हते, असं बोललं जात होतं. मुख्यमंत्री होणाऱ्या फडणवीसांचा फोन मात्र त्यांनी घेतला. पण वैयक्तिक कार्यक्रम आधीच ठरल्यानं ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला येणं आपल्याला जमणार नसल्याचं सांगितलं, अशी माहिती फडणवीसांनी दिली होती. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्री या नात्यानं एकनाथ शिंदेंचाही सहभाग होता. त्यामुळं ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला जाणं टाळलं.

असो, पण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यावर काही दिवसांतच नागपुरात हिवाळी अधिवेशन झालं. त्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी स्वतः फडणवीसांच्या दालनात जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले, आणि सुरू झाल्या भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार का, अशा आशयाच्या चर्चा. या भेटीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया देखील सूचक होती. आम्ही काही शत्रू नाही, आणि आता आमच्या भेटी मोजू नका, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram