Special Report | बीडमध्ये कोरोना काळात CCTV घोटाळा? 4 लाखांऐवजी 20 लाखांचा खर्च?
Continues below advertisement
कोरोनाच्या संकट काळात अत्यावश्यक सेवेसाठी खर्च करणं आवश्यक होतं मात्र कोरोनाची भीती दाखवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केला आहे. बीड जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होती. या बैठकीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. यावेळी बोलताना नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई आणि केजच्या कोविड हॉस्पिटलसाठी खरेदी करण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला असल्याची तक्रार केली आहे.
Continues below advertisement