Special Report Bus Depo Reality Check : एसटी डेपोंची 'रिअॅलिटी', 'माझाचा' चेक
Special Report Bus Depo Reality Check : एसटी डेपोंची 'रिअॅलिटी', 'माझाचा' चेक
पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर आम्ही मुंबईतल्या तीन प्रमुख एसटी डेपों मधल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला एसटी स्टॅंड मधल्या सुरक्षा व्यवस्थेच्या रियालिटी चेक मधून नेमकं काय समोर आलं तेही आपण पाहूयात. आणि सध्या मुंबई सेंट्रल या प्रमुख एसटी स्टॅन्ड जवळ आहे आणि या ठिकाणी नेमकी रियलिटी काय आहे ते आपण आज पाहणार आहोत तर चला आपण मुंबई सेंट्रल मध्ये आतमध्ये जाऊन पाहणी करूया. आणि आपण पाहतोय की सकाळी खरतर साडे पाच वाजल्यापासून या ठिकाणी एसटीचा प्रवास हा सुरू होता आणि त्यानुसार या ठिकाणी काही प्रवासी याठिकाणी एसटी साठी आलेले आहेत मात्र कुठलाही सुरक्षारक्षक नाहीये या ठिकाणी आपण पाहतोय तर दुसरीकडे आपण पाहिलं तर सीसीटीव्ही कॅमेरेस तर सीसीटीव्ही कॅमेरेस या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळतात तर हा एक माझ्या समोरचा सीसीटीव्ही कॅमेरा आहेत सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आपण पाहू शकता आणि दुसरीकडे हा दुसरा सीसीटीव्ही एक कॅमेरा आहे आणि तिथे समोरचा हा एक तिसरा जो स्पायडर कॅमेरा म्हणून ओळखला जातो हा सीसीटीव्ही कॅमेरा आहे. ज्यावेळी आम्ही माहिती घेतली त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की गाड्या ज्या ठिकाणी सुटतायत त्या ठिकाणी सुरक्षारक्षक आहेत. थोड्या वेळापूर्वी सुरक्षारक्षक या ठिकाणी होते मात्र ते काही कारण तिकडे गेले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मुंबई सेंट्रल एसटी डेपोचा आढावा घेतल्यानंतर आपण पोहोचलोय परळ या एसटी डेपो जवळती आपण पाहूयात आतमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आतमध्ये जर का आपण आलो तर या ठिकाणी आपल्याला दोन मेटल डिटेक्टर मिळतील मात्र त्यांची अवस्था ही जर आपण पाहिली तर हे मेटल डिटेक्टर बंद आहेत. अशाच पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरा हा लावण्यात आलेला आहे. यासह एसटी डेपोतन एसटी गाड्या ज्या ज्या वेळी बाहेर पडत आहेत त्यामध्ये एकाड एक पिलर सोडून या ठिकाणी जे स्पायडर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत. परे. डेपोच्या सध्या आम्ही मध्यभागी आहोत ज्या ठिकाणाहून या एसटी सुटत असतात हा संपूर्ण परिसर जर पाहिलं तर अनेक ठिकाणी थोडासा अंधार हा प्रामुख्याने पाहायला मिळतो आहे. हॅमस लाईट लावण्यात आलेले आहेत चौफेर प्रकाश पडावा मात्र त्या देखील या झाडांमध्येच झाकवल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हा अंधार सोडला तर इतर सुरक्षा किंवा इतर सीसीटीव्हीच्या कक्षेत हा संपूर्ण एसटी स्टॅंड आहे. असल्याच देखीलच पाहायला मिळालेल आहे. फक्त विद्युत रोषणाईचा प्रश्न हा प्रामुख्याने पर एसटी स्टॅंड वरतीच पाहायला मिळाला आहे.