Special Report Ajit Pawar :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?
Special Report Ajit Pawar :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?
लोकसभेच्या निवडणुका झाल्या.. विधानसभेच्या निवडणुका झाल्या...
पण पवार काका पुतण्यांमधला राजकीय ड्रामा अजूनही सुरूच आहे... या ड्राम्याच्या नवीन अंकाचं नाव आहे फोडाफोडीसाठी फोनाफोनी... होय.. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे खासदार फोडण्यासाठी फोनाफोनी सुरू असल्याचा आरोप होतोय.. हा ड्रामा फक्त फोनाफोनीपुरता मर्यादीत नाहीय... तर काँग्रेसचे काही अजितदादांना मदत करत असल्याचाही आरोप होतोय.. हा संपूर्ण ड्रामा पाहणार आहोत आजच्या राजकीय शोलेमध्ये..राष्ट्रवादी हा पक्ष, घड्याळ हे चिन्ह आणि लागोपाठ विधानसभेची लढाई जिंकल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीनं नवीन मिशन सुरू केल्याची खबर सुप्रिया सुळेंना मिळाली. सुप्रिया सुळे आणि शरद पवार वगळता इतर सात खासदार फोडण्यासाठी सुनील तटकरे अॅक्टिव्ह झाल्यामुळे सुप्रिया सुळेंचा पारा चढला... त्यांनी तटकरेंना फोन लावून नाराजी व्यक्त केली