Special Report Ajit pawar : धनूभाऊ, अजितदादांची सव्वा तास खलबतं, काय ठरलं?
Special Report Ajit pawar : धनूभाऊ, अजितदादांची सव्वा तास खलबतं, काय ठरलं?
धनंजय मुंडेंचं इतकं उघड समर्थन आजवर ना पक्षाध्यक्ष अजितदादांनी केलंय, ना मुख्यमंत्र्यांनी. मात्र मंत्रिमंडळातून बाहेर असलेले छगन भुजबळ मात्र मुंडेंना जाहीरपणे 'बाहेरून पाठिंबा' देताना दिसतायत.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा आरोप सर्वपक्षीयांकडून केला जातोय.भाजप आमदार सुरेश धसांनी तर 'आका' आणि 'आकाचा आका' या शब्दांचा वापर कमी करून आता थेट धनंजय मुंडेंवर नाव घेऊन प्रहार करायला सुरुवात केलीय. धनंजय मुंडेंवर अशी टीका सुरु असताना त्यांचे पक्षाध्यक्ष अजित पवार मात्र त्यांच्याबाबत काहीच बोललेले नाहीत. परदेश दौऱ्यावरून परत आलेले अजितदादा क्रिकेट खेळतायत… उद्घाटनं करतायत….मतदारांना जाबही विचारतायत…मात्र धनंजय मुंडेंना ना ते जाब विचारतायत, ना त्यांचं समर्थन करतायत…या मुद्द्यावरून कितीही डिवचलं तरी त्यांनी आपली समाधी भंग होऊ दिलेली नाही..या प्रश्नाचं उत्तरही अजितदादांकडून आलं नाही. मग हे प्रकरण लावून धरलेल्या धसांनी अजितदादांना थेटच प्रश्न विचारला.एवढं सगळं झाल्यानंतर आज धनंजय मुंडेंनी अजितदादांची भेट घेतली. सुमारे सव्वा तास झालेल्या या भेटीचं मुंडेंनी सांगितलेलं कारण ऐकून हसावं की रडावं, असाच प्रश्न सर्वांना पडला. या प्रतिक्रियेतून, आपण राजीनामा देण्याच्या मूडमध्ये बिलकूल नसल्याचा संदेशच धनंजय मुंडेंनी दिल्याचं मानलं जातंय. दुसरीकडं भुजबळांनी मात्र मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची इच्छा न लपवताही धनंजय मुंडेंची पाठराखण केलीय.