Special Report ABP Majha Impact संभाजीनगरमध्ये त्या शाळांवर कारवाईचा बडगा, निधी पळवणाऱ्यांवर कारवाई
Special Report ABP Majha Impact संभाजीनगरमध्ये त्या शाळांवर कारवाईचा बडगा, निधी पळवणाऱ्यांवर कारवाई
आता बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची... धनगर विद्यार्थ्यांच्या योजनेवर डल्ला मारल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधल्या दोन शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूल आणि स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून दोषी शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. गेले दोन दिवस एबीपी माझानं या योजनेसंदर्भातील भ्रष्टाचार समोर आणला होता. माझाच्या या इम्पॅक्टनंतर अवघ्या २४ तासात शासनानं तातडीनं पावलं उचलून संबंधित संस्थांवर कारवाईचा बडगा उगारलाय... पाहूयात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेंचा हा खास रिपोर्ट...
धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या योजनेवर डल्ला मारणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील शाळा आणि संस्थाचालकांचे कारनामे आणि या सगळ्या गैरप्रकाराचं विदारक वास्तव एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून आम्ही सर्वांसमोर मांडलं...
या सगळ्या प्रकरणाची शासनस्तरावरुन तातडीनं दखल घेण्यात आली... त्यानंतर शासनानं दोषी आढळलेल्या शाळांची मान्यताच रद्द केलीये... ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून ही कारवाई करण्यात आली...
गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूल आणि स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची मान्यता रद्द झालीये राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजनेत या दोन्ही शाळांनी मोठा घोटाळा केल्याचं उघड झालंय