Coronavirus | Special Parcel Train | कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणार स्पेशल पार्सल ट्रेन
कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ,कणकवली ,मडगाव आणि उड्डपी या चार स्थानकांवर या पार्सल ट्रेन मध्ये माल चढवता उतरवता येणार आहे. या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागात पाठवण्यासाठी देखील करता येणार असल्याने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.