Special Local Trains for 6 December : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेवर 12 विशेष लोकल
abp majha web team
Updated at:
04 Dec 2023 07:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Local Trains for 6 December : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेवर 12 विशेष लोकल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर चैत्यभूमीवर अनुयायांची मोठी गर्दी जमा होते. महामानवास अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी भारतासह जगभरातून लाखो अनुयायी येत असतात. दरम्यान, ही लाखोंची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने देशभरातून मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष १२ गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामुळे महामानवाचे महापरिनिर्वाणदिनी दर्शन सोपे होणार आहे.