Navi Mumbai Airport : काय आहेत नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये ?

Continues below advertisement

Navi Mumbai Airport :  काय आहेत नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये ?

 राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचे विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यात यावी, या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरुपाचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली होती. अशातच मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार असल्या माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.

वर्षाला 9 करोड प्रवाशी विमानतळाचा वापर करणार असल्याचा अंदाज 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या शहरातील मेट्रो थेट जोडल्या जाणार आहे. मुंबईतील समुद्र आणि खाड्यांचा वापर करून जल वाहतूकीने विमानतळ जोडणार आहे. त्यामुळे वर्षाला 9 करोड प्रवाशी या विमानतळाचा वापर करणार असल्याचा अंदाज आहे. मुंबई विमानतळावर एक रनवे, मात्र नवी मुंबई विमानतळावर दोन रन वे असल्याने दुप्पट क्षमता आहे. विमानतळावर चार टर्मिनल असून चारही टर्मिनल आंतर्गत जोडणार. जेणेकरून कोणत्याही टर्मिनलमधून आत आलेला प्रवाशी इच्छित ठिकाणी पोचणार. हल्ली मुंबई विमानतळावर बाहेर जावून खाजगी वाहणं पकडून दुसऱ्या टर्मिनल वर जावे लागत असल्याने भविष्यात ही समस्या दूर होणार आहे. किंबहुना यात सोलरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार असल्याची माहिती ही विजय सिंघल यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram