Monsoon IMD Prediction : अंदमानचा समुद्र आणि निकोबार बेटांवर मान्सूनचं आगमन ABP Majha

Continues below advertisement

यंदा मान्सून लवकर येण्याचा अंदाज हवामान खात्यानं आधीच वर्तवलाय त्यानुसार मान्सून आज अंदमानचा समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल होणार आहे... मान्सूनचं अंदमानात आगमन होत असताना केरळच्या किनारपट्टीवर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचाही अंदाज आहे... यंदा असनी चक्रीवादळानंतर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मान्सूनच्या वाऱ्यांना गती मिळालेय... त्यामुळे या महिना अखेरीस मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे.. राज्यातही आजपासून पुढील ४ दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. राज्यातल्या ९ जिल्ह्यांना हवामान खात्यानं यलो अलर्ट दिलाय. तर बीड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram