Aaditya Thackeray : दक्षिण मुंबईतील रस्त्यांसाठी नवं टेंडर प्रसिद्ध, कंत्राटावर आदित्य ठाकरेंचं सवाल
Continues below advertisement
मुंबईतील कथित रस्ते घोटाळ्यात एक कंत्राटदार निलंबित झाल्यावर दक्षिण मुंबईतल्या रस्त्यांसाठी आता नवीन टेंडर निघाले आहेत. या टेंडरबाबत शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. आताच्या टेंडरची रक्कम ३०० कोटींनी कमी आहे, हा फरक कसा काय झाला असा सवाल आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून केला आहे. त्याचं कारण म्हणजे आधीचं टेंडर एक हजार ६७० कोटींचं होतं. पण नवं टेंडर एक हजार ३६२ कोटींचं आहे. आधीच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, आणि त्याचं नाव सर्व मोठ्या वर्तमानपत्रात छापून आणा अशी मागणी देखील आदित्य ठाकरेंनी केली आहे
Continues below advertisement