Omicron : द.आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या व्यक्ती COVID Positive, नमुने चाचणीसाठी मुंबईत पाठवणार

Continues below advertisement

आता राज्य सरकारनंही देव पाण्यात ठेवले असणार. कारण मुंबईजवळच्या डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळलाय. या प्रवाशाला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे की नाही? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिका आरोग्य सतर्क झालीय. या रुग्णाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी मुंबईत पाठवले जाणार आहेत. हा प्रवासी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून २४ नोव्हेंबर रोजी दिल्लीत आला होता. त्यावेळी दिल्ली एअरपोर्टला केलेली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याने आपल्या कुटुंबियांना याची कल्पना दिली होती .यामुळे त्याच्या घरातील सर्व सदस्य नातेवाईकांची घरी शिफ्ट झाले होते. तो एकटाच घरी विलगीकरणात राहत होता. मात्र त्याला ताप येऊ लागल्याने त्यानं टेस्ट केली असता कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झालं. या रुग्णाला आता पालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram