Somnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हान
Somnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हान
परभणीत न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचे पडसाद राज्यभर उमटले. विधिमंडळात यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचा पाहायला मिळाल्यानंतर आज परभणीत राहुल गांधींसह शिवसेना आणि भाजपचे मंत्रीही सोमनाथच्या कुटुंबीयांचा सांत्वन करण्यास येणार आहेत. परभणी शहरातील संवेदनशील घटनांमुळे तापलेल्या वातावरणात आज काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी परभणीत दाखल होणार आहेत. त्यामुळे राजकीय घटनांना वेग आला आहे. आता राहुल गांधींचा उपस्थितीवर अक्षय घेत भाजप आमदार आशिष देशमुख यांनी जोरदार टीका केली आहे. परभणीतील घडामोडी, न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. मग राहुल गांधी परभणीला येऊन जातीय विद्वेष पसरवण्यासाठी येत आहेत का असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस गेल्या 70 75 वर्षात संविधानाची मोडतोड केली म्हणून राहुल गांधी यांनी आज परभणीत देशाची माफी मागावी असेही आशिष देशमुख म्हणाले.
सोमनाथ यांच्या अंत्यविधीनंतर घरी जात असताना आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे परभणीतील वातावरण चांगलेच तापले होते. विधिमंडळातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या कुटुंबांना भेट देऊन सांत्वन केल्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत दाखल होतील.