Workplace Harassment: सोलापूर: बेकायदेशीर कर्ज नाकारल्याने महिलेचा छळ, १० जणांवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
सोलापूरमधील (Solapur) किश्त फायनान्स (Kisht Finance) कंपनीत एका महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ब्रांच मॅनेजर निलेश पायमल्ले (Nilesh Paymalle) याच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या एचआरने (HR) उलट 'अशा मुली कॅरेकटरलेस असतात' अशी शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. बेकायदेशीर कर्ज (Illegal Loan) मंजूर करण्यास नकार दिल्याने हा छळ सुरू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कार्यालयातील १४ कर्मचाऱ्यांमध्ये पीडिता एकमेव महिला होती आणि तिच्यासाठी स्वतंत्र वॉशरूमची (Washroom) सोयही नव्हती. इतर कर्मचारी अश्लील शेरेबाजी करून छेड काढत असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement