Solapur Vaccination : मशिदीत एका दिवसात 400 जणांचं लसीकरण; जनजागृतीसाठी मोठं पाऊल ABP Majha
सोलापुरात पहिल्यांदाच मशिदीमध्ये लसीकरणाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एका दिवसात जवळपास 400 लोकांनी लस घेतली. सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी या शिबिरास भेट देऊन लसीकरणाविषयी माहिती दिली.