Unlock : सोलापूर मनपा क्षेत्रातील नागरिकांना दिलासा, अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरु राहणार

Continues below advertisement

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरु राहणार असून अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते 2 पर्यंत परवानगी असेल. विशेष म्हणजे दुपारी तीननंतर अत्यावश्यक कारण, वैद्यकीय कारण वगळता नागरिकांना संचार करण्यास बंदी असेल. विनाअत्यावश्यक सेवेतील केवळ एकल दुकानांना परवानगी, शॉपिंग सेंटर, मॉल्स यांना परवानगी नाही. याशिवाय यंत्रमाग, विडी, गारमेंट उद्योगांना देखील सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळत परवानगी असेल. महापालिकेला स्वतंत्र घटक म्हणून मान्यता मिळाल्याने आयुक्त पी. शिवशंकर यांनी हे आदेश जारी केले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram