Truck Driver Strike : Solapur जिल्ह्यात पोलिसांनी केलं टँकर चालकांचं प्रबोधन, संप मागे! ABP Majha

Continues below advertisement

सोलापूर : नवीन वाहन कायद्याला (New Vehicle Act) विरोध करण्यासाठी देशभरात ट्रक चालक (Truck driver) आणि इंधन टँकर (Tanker) चालकांनी संपाची हाक दिल्याने अनेक ठिकाणी पेट्रोल-डीझेलची (Petrol-Diesel) टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, सोलापूर (Solapur) जिल्ह्यात देखील नवीन वाहतूक कायद्याच्या विरोधात पेट्रोल-डिझेल टँकर चालक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तर, सोलापुरातील हिंदुस्तान पेट्रोलियम येथील डेपो मधील टँकर चालकांनी संप पुकारला होता. मात्र, पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे. तर, वाहतूक सुरु केली असली तरीही कायद्यातील तरतुदींना मात्र वाहन चालकांचा विरोध कायम आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram